सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडीतील सामंत ब्रदर्स कापड दुकानाचे मालक श्यामसुंदर विष्णु सामंत ( ८२, रा. मळगांव मांजरेकरवाडी ) यांचे बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास निधन झाले. बुधवारी त्यांना सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
एक प्रतिथयश कापड व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. सावंतवाडी शहरातील हॉटेल सेव्हन हिल्सचे देखील मालक होते. सामाजिक व शैक्षणिक कार्यातही ते अग्रभागी असायचे. मुंबई ऐक्यवर्धक संघाच्या मळगांव इंग्लिश स्कूलचे ते स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन राहिले होते. प्रशालेच्या भौतिक विकासात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला होता. मळगांव ब्राम्हणपाट येथील केंद्रशाळेच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, तीन विवाहीत मूली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संजय सामंत व शैलेंद्र सामंत यांचे ते वडिल होत.
Sindhudurg