रिषभ पंतवर मुंबईमध्ये उपचार, एअर अ‍ॅम्बुलन्सने रवाना

Google search engine
Google search engine

भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्यावर पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत. ३० डिसेंबरला रिषभ कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर देहराडून येथे उपचार सुरू होते.  रुरकीजवळ कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. डेहराडूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र BCCI व दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. BCCI व DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जातील. रिषभला मॅक्स हॉस्पिटलमधून बाहेर आणतानाची दृश्य हाती आली आहेत. यामध्ये रिषभला स्ट्रेचरवरून अ‍ॅम्बुलन्समध्ये ठेवल्याचे दिसत आहे. पण, मीडियाने प्रचंड घोळका केल्याने रिषभचे नातेवाईक भडकलेले दिसत आहेत.

बीसीसीआयने रिषभ पंतच्या उपचारावरील वैद्यकिय बुलेटीन जाहीर केले आहे आणि त्यात रिषभला देहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी एअर अॅम्बुलन्सने आणण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. डॉ. दिनशाव पार्दीवाला हे रिषभवर उपचार करणार आहे. रिषभच्या लिगामेंटवर शस्त्रक्रिया होणार आहे.

काय म्हणाले DDCA चे संचालक?
डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा म्हणाले, क्रिकेटपटू रिषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत यांच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

IPL 2023 मध्ये खेळण्याबाबत शंका
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर पंत दुबईला पोहोचला होता. तेथून ते २९ डिसेंबरला दिल्लीला आला आणि तेथून खासगी कारने रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आता दुखापतीनंतर पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि आयपीएल २०२३ मध्ये खेळण्यावर साशंकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी चार ते सहा महिने लागू शकतात.