रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हा दौरा संपन्न

रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असो.वतीने फोटोग्राफर च्या भेटीगाठी घेवून फोटोग्राफर बंधूच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकताच जिल्हा दौरा चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असो.चे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय शिंदे ,उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर,कार्याध्यक्ष गुरू चौगुले,सचिव प्रविण पाटोळे ,सहसचिव विनय गोंधळेकर,खजिनदार सुरेंद्र गिते ,संघटक संदेश टिळेकर व पदाधिकारी सहभागी झाले होते.सर्व ठिकाणी पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये राजापुर, लांजा,संगमेश्वर-देवरूख , रत्नागिरी,गुहागर, दापोली,खेड,चिपळूण या सर्रव तालुका असो.सोबत भेटी घेवून फोटोग्राफर बंधूना उद्भवणार्या समस्या,त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वर्कशाॅप चे आयोजन, संघटना नोंदणी व सदस्य वाढीसाठी उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्या.हा दौरा यशस्वी करण्यासाठी राजापुर तालुका अध्यक्ष राजेश खांबल,लांजा रविंद्र कोटकर,देवरूख संगमेश्वर राऊत,रत्नागिरी तालुका अध्यक्ष सचिन सावंत,गुहागर तालुका अध्यक्ष बावधनकर,दापोली तालुका अध्यक्ष महेश्वर जाधव,मंडणगड मधून पिंपळकर,खेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब सासणे,चिपळूण तालुका अध्यक्ष सचिन शेठ व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.असो वतीने सर्व पदाधिकारी व फोटोग्राफर बंधूचे आभार मानले आहेत.