लायन्स कुडाळ आयोजित सिंधू लायन्स फेस्टिवल उत्साहात संपन्न

जयहिंद कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या फूड स्टॉलला खवय्यांची प्रचंड पसंती

कुडाळ । प्रतिनिधी : लायन्स कुडाळ आयोजित सिंधू लायन्स फेस्टिवल हा सिंधुदुर्ग मधील भव्य फेस्टिवल नुकताच कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर पार पडला, या महोत्सवात सहभागी जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगांवच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजने घातलेल्या फूड स्टॉलला लोकानी प्रचंड पसंती दर्शवली.
या तीन दिवसीय महोत्सवाच्या दरम्यान कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षाआफ्रीन करोल,ॲड.अमोल सामंत, ॲड. अजित भणगे, दैनिक तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कोकण रिजनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सारस्वत बँकचे डायरेक्टर सुनील सौदागर, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण कला केंद्र अध्यक्ष व साईजळवी फिल्मसचे निर्माते-दिग्दर्शक साईनाथ जळवी व बऱ्याच नामांकित व्यक्तीनी उपस्थिती व पसंती दर्शवली. उपक्रमाला यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे संस्थेने आभार मानले.