मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश

सावंतवाडी । प्रतिनिधी : मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या एकूण पाच विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी झाली असून या विद्यार्थ्यांनी जिल्हा व विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादन केले होते.
यात १७ वर्षाखालील मुलांच्या गटात देवांग रमाकांत मल्हार, राम प्रकाश फाले यांची तर १४ वर्षाखालील गटात भावेश विजय कुडतरकर व अमूल्य अरुण घाडी तर १९ वर्षाखालील गटात अथर्व मुकुंद सावंत यांची विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालाचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना उपमुख्याध्यापिका सि. मेबल करवालो पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. राजेंद्र मोरे सर व सौ. शेरॉन अल्फांसो यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने तसेच सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून अभिनंदन होत आहे