मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक मंदीचंमोठं सावट आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. तर दुसरीकडे कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत भारताशेजारील दोन देशांची अवस्था अत्यंत बिकट आहे. श्रीलंकेपाठोपाठ आणि पाकिस्तानचीही अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
पाकिस्तानी नागरिक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेऊन जाण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लोकांवर सध्या अत्यंत वाईट वेळ आली आहे. तिथली परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जेवणा-खाणाचे हाल आहेत. इतकं कमी की काय गॅस सिलिंडर तर 10 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
एवढंच नव्हे तर, अधिक वीज खेचणाऱ्या पंख्यांचे उत्पादनदेखील थांबवण्यात आला आहे. मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज 43 लाख कोटी पाकिस्तानी रुपये झाले होते. इम्रान खानच्या काळात कर्ज आणखीन वाढले. इम्राम खान यांनी तीन वर्षांत जनतेवर जवळपास दररोज 1400 कोटी रुपयांचे कर्ज वाढवल्याचा आरोप करण्यात येत आहे.