खोदकाम करताना घोरपड सापडली, खाण्यासाठी भाजली, वनविभागानं कारवाई करताच रडू कोसळलं

Google search engine
Google search engine

अमरावती : शहरातील कठोरा भागात राहणाऱ्या एका मजुराला खोदकामादरम्यान घोरपड नावाचा प्राणी सापडला. यानंतर त्यानं घोरपडीला भाजून रोस्ट करुन ताव मारायचं ठरवलं. मजूर घोरपड भाजत असल्याची माहिती वनविभागाला समजली होती. वनविभागानं त्याला ताब्यात घेताच त्याला रडू कोसळलं.

काही मजुरांच्या झोपड्या आहे. हे मजूर याच भागात कामासाठी आले असून त्यामध्ये राजू शिंदे आहे. मंगळवारी दुपारी जेसीबी मशीनद्वारे खोदकाम सुरू असताना शिंदेला एक घोरपड दिसली. ती दिसताच शिंदेची पकडली आणि तिला भाजून खाण्यासाठी आणली.

झोपडीजवळ आणून घोरपड भाजली. घोरपड भाजत असतानाच ही माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे डाळीच्या आरएफओ वर्षा हरणे, वनपाल श्याम देशमुख आणि अन्य कर्मचारी त्या परिसरात पोहोचले. वन विभागाच्या पथकाने पाहिले असता शिंदे घोरपड भाजत होता. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने ही भाजलेल्या स्थितीतील घोरपड व शिंदेला ताब्यात घेतले. शिंदेविरुद्ध वन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करुन कारवाई करुन सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. जप्त केलेली घोरपड जवळपास एक फूट लांबीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरातून कठोरा गावाकडे जाणाऱ्या मार्गालगत काही मजूर झोपड्या बांधून राहत आहेत. त्याच परिसरात त्यांचे काम सुरू आहे. एक व्यक्ती घोरपड भाजत असल्याची माहीती वन विभागाला मिळाली. या माहीतीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने भाजलेली घोरपड व घोरपड भाजणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याने ही घोरपड खाण्यासाठी भाजली होती मात्र खाण्यापुर्वीच तो वन विभागाच्या जाळ्यात आला आहे