माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल माखजन चा १०५ वा वर्धापन दिन ७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
हा कार्यक्रम ७ रोजी सकाळी ८.३० वा.संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद साठे यांचे अध्यक्षते खाली प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे.या कार्यक्रमाला संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार जे.डी.पराडकर,केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जन शिक्षण संस्थान योजनेच्या संचालिका सौ ज्योती यादव,मावळंगे गावचे पोलिस पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमावेळी पारितोषिक वितरण,विद्यार्थ्यांनी स्वहस्ते साकारलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन, होणार आहे.तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या कौशल्य विकास अंतर्गत येणाऱ्या काही कोर्सेस चा शुभारंभ होणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चिटणीस राजेश फणसे व मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले आहे.