वजराट शाळेचा स्कॉलरशीप परीक्षेचा 100 टक्के निकाल : 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ले तालुक्यातील वजराट नंबर 1 या शाळेची शाळेची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. इयत्ता पाचवी स्कॉलरशीप परीक्षेमध्ये बसलेल्या 11 पैकी 11 हि विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे यापैकी 5 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह शाळेचे गावातून व तालुक्यातून अभिनंदन होत आहे. वजराट शाळेतील उत्तीर्ण 11 विद्यार्थ्यांमध्ये कु. तुषार सूर्यकांत परब 246 गुण, कु.लावण्या जयवंत राणे 244 गुण, कु.मंदार कृष्णा खरात 244 गुण, कु.साक्षी मोहन दळवी 232 गुण, कु.मधुरा दिलीप परब 228 गुण हे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. तर सोनाक्षी संदीप देसाई 200 गुण, कु.मंगेश निलेश परब 184 गुण, तुकाराम साईकृष्ण कांदे 182 गुण, पवित्रा प्रभाकर मेस्त्री 156 गुण, श्रवाणी नारायण कळेकर देसाई 150 गुण, विनायक बाळकृष्ण सोनसुरकर 130 गुण हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक श्री.कृष्णा रमेश खरात, श्रीम.वसुंधरा मुरारी सुर्वे, वर्ग शिक्षक श्री तेजस विश्वनाथ बांदिवाडेकर आणि मुख्याध्यापक श्री संजय बाळकृष्ण परब यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि पालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान शिक्षक पालक संघ व ग्रामस्थांच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.