येत्या 8 जानेवारीपर्यत नाव नोंदणी करण्याचे खेळाडूंना आवाहन
वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ले लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन वेंगुर्ले व गवंडे अँकेडमी वेंगुर्ले यांचे संयुक्त विद्यमाने दि. 25 जानेवारी रोजी वेंगुर्ले कॅम्प पॅव्हेलियम येथील क्रिडा मैदानावर 21 वर्षाखालील खेळाडूंसाठी सिंधुदुर्ग प्रिमीयर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यांत आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या 21 वर्षाखालील म्हणजे 1 जानेवारी 2001 नंतर जन्म झालेल्या खेळाडूंनी दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे नांवनोंदणी करण्याकरीता आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीसह उपस्थित रहावयाचे आहे. नाव नोंदणी झालेल्या संभाव्य खेळाडूंमधून दोन संघ निवडले जाणार आहेत. त्या दोन संघाचे कोल्हापूर, सांगली व गोवा या संघांशी सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजू गवंडे मोबा-7350517635 किंवा 9403557774 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.