श्री भगवती हाय. मुणगे येथे वार्षिक बक्षीस वितरण उत्साहात
मसुरे | झुंजार पेडणेकर : जीवनात योगाला महत्व ध्या. विविध क्रीडा व शैक्षणिक उपक्रमात संस्था तुमच्या बरोबरीने राहील. यश मिळवणे सोपे परंतु टिकवणे कठीण आहे. विध्यार्थी मित्रानो शिक्षण घेऊन खूप यश मिळवा मात्र मोठे झाल्यावर आपल्या शाळेला विसरू नका असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर यांनी येथे केले. देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष कै बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यावेळी त्रिंबक हाय. माजी मुख्याध्यापक उदय मेहेंदळे, संस्था उपाध्यक्ष विलास मुणगेकर, सुरेश बांदेकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, माजी सभापती भाई पारकर, सरपंच सौ. साक्षी गुरव, सौ. शरयू घाडी, विजय पडवळ, सुधीर मुणगेकर, वसंत शेट्ये, संतोष लब्दे, व्यवस्थापक आबा पूजारे, माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर, माजी सरपंच वसंत शेट्ये, अनिकेत पाटील , गौतम मुणगेकर, दिलीप महाजन, धर्माजी आडकर, नाना बागवे, वसंत गुरव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रशालेच्या विध्यार्थ्यांनि बनविलेल्या ‘पारिजात’ या हस्तलिखिताचे प्रकाशन तसेच हस्तकला प्रदर्शनाचे उदघाटन उदय मेहेंदळे यांनी केले. हस्तलिखिताचे मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी उदय मेहेंदळे म्हणाले, आपल्या कडील संपत्तीचा वापर चांगल्या कामासाठी करण्याची कै. बापूसाहेब पंतवालावलकर यांची कृती अनुकरणीय आहे. विविध कला शालेय जीवनात आत्मसात करा.आयुष्यात लहानपणी शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. चांगले संस्कार जीवनात बाळगून यश मिळवा. यावेळी उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, पवन स्पोर्ट्सचे प्रशिक्षक अनिकेत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. बाल प्रबोधिनीच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सौ. शरयू घाडी यांच्या हस्ते तसेच माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी पाच विध्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले.
यावेळी चंद्रकांत रासम, आशिष आईर, जयप्रकाश मुणगेकर, श्री. सावंत, दिगंबर बागवे, श्री. पुजारे, राजेंद्र प्रभू, सौ अनुराधा बांदेकर, सौ. मुणगेकर, एन. जि. वीरकर, प्रसाद बागवे, सौ. गौरी तवटे, गुरुप्रसाद मांजरेकर, हरीश महाले, प्रणय महाजन, सौ रश्मी कुमठेकर, प्रियांका कासले, एन. एल. बागवे, स्वप्नील कांदळगावकर, संतोष मुणगेकर, मनोहर कडू, श्री नार्वेकर आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, सुत्रसंचलन सौ. गौरी तवटे, प्रसाद बागवे, प्रणय महाजन तर आभार सौ. मिताली हिर्लेकर यांनी मानले.