कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ हळवल येथे ५१ जणांनी केले रक्तदन

Google search engine
Google search engine

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांचा उपक्रम

कणकवली | प्रतिनिधी : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्यावतीने कै. प्रमोद परब स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ हळवल सरपंच अपर्णा चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला या शिबिरात 51 दात्यांनी रक्तदान केले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते त्यासोबत आरोग्य शिबिर वनराई बंधारे परिसर स्वच्छता महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर विविध शालेय स्पर्धा आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात आपल्या मित्राच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन या मंडळामार्फत केले जाते रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी हळवल उपसरपंच सान्वी गावडे, मंडळाचे अध्यक्ष लवू परब, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपेश परब, खजिनदार गणेश गावडे, अरुण राऊळ, वामन परब, शशिकांत राणे, जगन्नाथ गुरव, प्रदीप गावडे, सुदर्शन राणे, किरण राऊळ, विकास गावडे, दीपक राऊळ, मंगेश गावडे, सतीश गावडे, प्रशांत गावडे, गिरीश परब, अनिकेत परब, हर्षल परब, गायत्री गावडे, गौरी परब, सिद्धेश परब, अजय परब, सचिन परब, संदीप परब, विराज परब, विक्रांत परब, रोहन राणे, विध्येश शेलार, अक्षय गावडे, अशोक चव्हाण, आरोग्य कळसुली विभागातील डॉ. पाटील, आरोग्य सेविका निधी राऊळ, उमेश परब, जिल्हा रुग्णालय रक्तपिढी सिंधुदूर्गचे रक्तसंकलन अधिकारी हळदणकर, प्रांजल परब, मयूरी शिंदे उल्हास राणे, सुरेश डोंगरे, नितीन गावकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.