सावंतवाडी । प्रतिनिधी :
मळगाव इंग्लिश स्कुल , मळगाव वा. भ. कांबळी स्मारक रंगमंच व ॲड जिवाजी नारायण पाडगांवकर सभागृहात प्रशालेचा ६२ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मंगळवार १० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगाव एक्यवर्धक संघ मुंबई सचिव आर. आर. राऊळ, प्रमुख अतिथी उद्योजक म्हापसा गोवा येथील अशोक झारापकर, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० .३० वाजता ईशस्तवन, स्वागतगीत, पाहुण्यांची ओळखओळख व स्वागत प्रास्ताविक , अहवाल व संदेश वाचन, गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार, पारितोषिक वितरण मान्यवरांची भाषणे , आभार संध्याकाळी ६.३० ते १० पर्यत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक एम. बी. फाले सांस्कृतिक विभागप्रमुख ऋतुजा सावंत भोसले, शालेय सांस्कृतिक मंत्री सिया नाटेकर, शालेय मुख्यमंत्री दिया वायंगणकर यांनी केले आहे.