प्रहारचे पत्रकार लुमा जाधव यांना कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

अभिमन्यू लोंढे, विनायक गांवस, रमेश बोंद्रे परशुराम मांजरेकर यांचाही समावेश

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फ दिले जाणारे पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले.

यात दैनिक प्रहारचे ओटवणे प्रतिनिधी लुमा जाधव यांना ॲड. अनिल निरवडेकर पुरस्कत कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार जाहिर झाला.

तर मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गावस (दै. कोकणसाद), माजी आमदार तथा जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार

अभिमन्यु लोंढे (दै. रत्नागिरी टाईम्स), स्व. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार (धारणकर कुटुंबीयांकडून देण्यात येणारा )

ग्रामीण पत्रकार परशुराम मांजरेकर (दै. तरुण भारत) यांना तसेच डॉ. अजय स्वार पुरस्कृत

जीवनगौरव पुरस्कार रमेश बोंद्रे (साप्ता. वैनतेय कार्यकारी संपादक) यांना जाहिर झाला.

सावंतवाडी तालुका आदर्श पत्रकार संघाच्या पुरस्काराची निवड समितीची बैठक गुरुवारी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण माजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुरस्कार निवड समितीमध्ये उपसंपादक अवधूत पोइपकर , सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर , ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई मागिल पुरस्कार प्राप्त विजेते आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र पवार, विद्यमान जिल्हा पुरस्कार प्राप्त विजेते आणि तालुका कार्यकारणी सदस्य सचिन रेडकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर सदस्य मोहन जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

Sindhudurg