चिपळूण | वार्ताहर : डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत ल. वालावलकर रुग्णालयातर्फे पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत महाशस्त्रक्रिया शिबीर दि. ७ व ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, पित्तशयातील खडे, अल्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, नाकाचा हाड वाढणे, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, इम्प्लांट रीमूव्हर करण्यात येणार आहे. तरी रुग्णांनी नोंदणीसाठी सचिन धुमाळ (९२७२८९७८३४), संकेत जांभळे (९९२२५६६६३९), संदीप पाटील (९२०९१६५०४१) यांच्याकडे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे