वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीतर्फे पत्रकार दिन साजरा

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले | प्रतिनिधी : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वसा वेंगुर्ले तालुक्यातील पत्रकार आजही जोपासत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी केले.
वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीतर्फे वेंगुर्ले येथील कार्यालयात आज सकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी देसाई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक व माजी वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील दुबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक सदस्य दीपेश परब तसेच तालुका पत्रकार समितीचे सचिव अजित राऊळ, केजी गावडे, एस एस धुरी, सुरज परब, योगेश तांडेल, अजय गडेकर, सीमा मराठे, प्रथमेश गुरव, आपा परब, विनायक वारंग आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त एस एस धुरी यांचा प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.