सिध्दयोग विधी कॉलेज खेडच्या विद्यार्थ्यांनी केली शिबिरातून कायदेविषयक जनजागृती

जामगे येथे पथनाट्यातून दिला सामाजिक संदेश

संतोष कुळे | चिपळूण :खेड तालुक्यातील जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवस्थानाच्या सभागृहात शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचालित सिध्दयोग विधी महाविद्यालय खेडच्या विद्यार्थ्यांचे कायदेविषयक जागृतीपर शिबिर शुक्रवार ६ रोजी ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लोकांना कायद्याचं ज्ञान अवगत व्हावं. त्यांच्या मनातील पोलिसांविषयी असणारी भीती कमी व्हावी आपले हक्क अधिकार कायद्याच्या माध्यमातून आपण कसे मिळवू शकतात. या संदर्भातली माहिती देण्यासाठी सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथील विद्यार्थ्यांनी जामगे येथील श्री कोटेश्वरी मानवी देवस्थानाच्या सभागृहात पथनाट्य आणि विचारांच्या देवाणघेवानीतून जागृती केली.

प्रथम आलेल्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सीईओ हेमांगी पोळ, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे आणि सर्व प्राध्यापक यांचे जामगे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे पदाधिकारी चंद्रकांत कदम व ग्रामस्थ यांनी स्वागत केले. त्यांनतर महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिन गोवलकर यांनी जातपंचायत कायदा या संदर्भातील सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अर्थव पिसे यांनी आपले अधिकार, हमी सेवा कायदा आणि माहितीचा अधिकार याची माहिती दिली. गावकऱ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली व त्याबाबतची खबरदारी कशी घ्यावी याविषयी एका नाटकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.विधी महाविद्यालच्या प्रथम वर्षीय विद्यार्थिनी श्रेया कडू हिनी एकपात्री नाटकाद्वारे महिलांचे राजकारणातील स्थान आणि महिला किती चांगला बदल घडवून आणू शकतात याबाबत उत्तम सादरीकरण केले.

त्यानंतर विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल दाभाडे यांनी अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार आणि सामान्य माणसाचे FIR नोंदवण्याबाबतचे अधिकार यावर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या CEO dr. हेमांगी पोळ तसेच सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे मॅडम, प्राध्यापिका केतकी आठवले, प्राध्यापिका हर्षदा कदम आणि जामगे गावचे सरपंच सौ देविका जाधव, चंद्रकांत कदम, पोलीस पाटील प्रसाद कदम, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण कदम, विजय कदम, अंकुश कदम, शशिकांत चव्हाण, ग्रामसेवक आणि इतर नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी दर शनिवारी सिद्धयोग विधी महाविद्यालयात कायदेविषयक मोफत सल्ला देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केतकी आठवले यांनी केले