घोणसरी ग्रामस्थ यांनी मानले आ.नितेश राणे यांचे आभार
माजी सभापती मनोज रावराणे यांनी केला होता पाठपुरावा
संतोष राऊळ (कणकवली);;
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा – घोणसरी मुख्य रस्त्यासाठी १ कोटी ९५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे घोणसरीसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची,वाहनधारकांची गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होणार आहे.फोंडा – घोणसरी मुख्य रस्ता मंजूर व्हावा यासाठी वारंवार माजी सभापती मनोज रावराणे यांनी पाठ पुरावा केला होता.
गेली २५ वर्षे रस्त्याची कोणतीही डागडुजी झाली नसून रस्त्यावरून चालणे ही अत्यंत कठीण असल्याने रस्ता नूतनीकरणासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२२-२३ योजनेअंतर्गत १ कोटी ९५ लाख निधी मंजूर करून दिला.
त्यामुळे वर्षानुवर्षे मागणी असलेला फोंडा – घोणसरी रस्ता नवीन होणार असून ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे माजी सभापती तथा घोणसरी पंचायत समितीचे माजी सदस्य मनोज रावराणे तसेच घोणसरी ग्रामस्थ,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आभार मानले.