पावस : पंचायत समिती रत्नागिरी व गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ५० वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनविषयान्वये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि .09 जानेवारी 2023 ते दि . 11 जानेवारी 2023 या कालावधीत लक्ष्मीकेशव माध्यमिक विदयालय , फणसोप येथे संपन्न होणार आहे . या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा सहभागी होणार आहेत . प्रत्येक शाळेतून वरील पैकी एका गटात एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच विदयार्थी सहभाग घेऊ शकेल . प्रदर्शनाचे वेळापत्रक व स्पर्धेबाबत माहिती खालील प्रमाणे आहे . दिनांक 09/01/2023 रोजी सकाळी १० ते ५ नोंदणी होईल.दिनांक 10/01/2023 रोजी सकाळी ९ते.१० विज्ञान दिंडी व सकाळी १०.३०ते ११.३०उद्घाटन होईल दु .१२ ते ५. विद्यार्थ्यांचा प्रश्नमंजुषा कार्यक्रम होईल.
दिनांक ११/१/२०२३ रोजी सकाळी १०.३० ते २.०० व्याख्यान होईल. दुपारी ३ ते ५.३० बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.१०/१/२०२३ ते११/१/२०२३ रोजी सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत प्रदर्शन पाहणेसाठी सर्वांना खुले असेल . स्पर्धेचे प्रकार इयत्ता ६ ते इयत्ता८ वी व इयत्ता ९ते इयत्ता १२ वी गटासाठी विज्ञान प्रतिकृती (मॉडेल) प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्यासाठी उपकरण व साधन तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी कलादालनाचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यकार्यकारीअधिकारी , उपमुख्यकार्यकारीअधिकारी , शिक्षणाधिकारी , गटविकासअधिकारी ,उपशिक्षणअधिकारी, गटशिक्षाधिकारी , तसेच श्री कमलाकर साळवी संस्था अध्यक्ष ,सौ नेत्रा राजेशिर्के मुख्याध्यापक लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक यांनी आपली कलाकृती सादर करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.