कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपची निर्विवाद सत्ता

Google search engine
Google search engine

उ.बा. ठा.शिवसेना पक्षाचा सुपडा साफ,सर्व उमेदवार पराभूत

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा उमटला ठसा

संतोष राऊळ (कणकवली)
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या शेतकरी खरेदी विक्री संघावर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. पंधरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चे १५ ही उमेदवार बहुसंख्य मतांनी निवडून आले. या निवडणकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षचा दारुण पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या यशस्वी विजयानंतर भारतीय जनता पार्टीने शेतकरी खरेदी विक्री संघात मिळवलेल्या विजयाने पुन्हा एकदा कणकवली तालुका हा राणेंच्या विचाराचा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे.

कणकवली शेतकरी संघ निवडणुकीत १४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा मोठा विजय झाला आहे.भाजपाची १ जागा यापूर्वीच बिनविरोध झाली असून एकूण १५ जागांवर विजय मिळाला आहे.या निकालात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. या विजया नंतर भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात येत आहे. कणकवली पंचायत समिती कार्यालय परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.