प्रशांत वनसकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश.!

Google search engine
Google search engine

कणकवली : रत्नसिंधू योजनेचे राज्य समितीचे सदस्य व कोकणातील सुप्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कलमठ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वनस्कर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. प्रशांत वनस्कर यांनी नुकत्याच झालेल्या कलमठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत ही निवडणूक लढवली होती. सामाजिक कामात प्रशांत वनस्कर हे नेहमीच अग्रभागी असतात. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, सुनील पारकर, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, महेंद्र सावंत, महेश राणे, सुनील हरमलकर आदी उपस्थित होते.