सावंतवाडी । प्रतिनिधी : मागील सहा दिवसापासून बेपत्ता झालेले कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक राजेश पाटकर, (रा. भटवाडी, सावंतवाडी ) हे अखेर हे रविवारी सकाळी ७ च्या सुमारास आंबोली येथील पोलीस दूरक्षेत्रात हजर झाले. तेथील पोलिसांनी त्यांची माहिती जाणून घेत त्यांना सावंतवाडी येथे पाठवून दिले.याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. सावंतवाडी येथून कलंबिस्त हायस्कूलला जातो असे घरात सांगून राजेश पाटकर हे २ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने याबाबतची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानी आपला मोबाईल व दुचाकी घरी ठेवल्याने पोलिसांना शोध लावण्यात मोठी अडचण येत होती. नातेवाईक व पोलीस त्यांचा शोध घेत होते. परंतु शोध लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर रविवारी सकाळीच बेपत्ता शिक्षक राजेश पाटकर हे आंबोली पोलिस दूरक्षेत्रात हजर झाले. तेथून त्याना सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्याच्या जबाबानंतर बेपत्ताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी कलंबिस्त हायस्कूलचे बेपत्ता शिक्षक परतले रविवारी सकाळी आंबोली पोलिस दूरक्षेत्रात उपस्थित