कणकवली (प्रतिनिधी)
विजय घरत यांच्या सौजन्याने आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दोनशाळांना संगणक संच प्रधान करण्यात आले. त्यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा वारगांव नं.३ व श्री.आरेश्वर विद्यालय आरे या दोन शाळांना संगणक संच आणि श्री वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे या शाळेला प्रिंटर देण्यात आले.
कणकवली ओम गणेश निवासस्थानी हे वाटप करण्यात आले. यावेळी वारगांव उपसरपंच नानासाहेब शेट्ये.खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत ,उत्तर भारतीय मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.अरविंद अवस्थी श्री.इरफान मुल्ला, तळेरे हायस्कूलचे श्री.अविनाश मांजरेकर,वारगांव नं.३ च्या श्रीम.कल्पना सावंत श्री सत्यवान केसरकर,आरे हायस्कूल चे श्री.खोचरे श्री.गोट्या पांगेरकर इ.मान्यवर उपस्थित होते.