कणकवलीत झळकले ठाकरे शिवसेनेच्या “पराभवाची हॅट्रिक”असे बॅनर.!

भाजपच्या एकतर्फी विजयानंतर चौका चौकात लागले फलक

संतोष राऊळ I कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा शेतकरी खरेदी विक्री संघात झालेला पराभव आणि भारतीय जनता पार्टीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर कणकवलीत “ठाकरे शिवसेनेच्या पराभवाची हॅट्रिक” असे बॅनर सर्व झळकले आहेत.

Thackeray Shiv Sena's "Hatrick of Defeat" banner was seen in Kankavli.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने भाजप विरुद्ध कणकवलीत प्रत्येक निवडणूक लढवली.मात्र या प्रत्येक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा, आमदार नितेश राणे यांनी धुवा उडवला. विधानसभेत सेनेचा पुरता पराभव केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे असलेले थोडेफार जे अस्तित्व होते ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपले. ठाकरे शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा केली होती मात्र या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षांसह शिवसेनेचे बडे नेते पराभूत झाले.त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका गेल्या दोन महिन्यापूर्वी लागल्या त्याचा निकाल पाहता कणकवली मतदारसंघासह तालुक्यात ठाकरे शिवसेनेचा दारुण पराभव झाला. कलमठ, बिडवाडी, हरकूळ,वागदे,ओसरगाव, हळवल अशा महत्त्वाच्या ग्रामपंचायती ज्या शिवसेनेच्या ताब्यात होत्या त्या पराभूत करून आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या तालुक्यातील उरल्यासुरल्या अस्तित्वालाही धक्का दिला.
त्यानंतर शेतकरी खरेदी विक्री संघाची तिसरी निवडणूक काल झाली. या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत,आमदार वैभव नाईक,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी पाटबंधारे उपाध्यक्ष संदेश पारकर अशा नेत्यांची या शेतकरी खरेदी विक्री संघात प्रतिष्ठा पणाला लावली होती. मतदान केंद्रावर येऊन सुद्धा बसले होते.ठाकरे शिवसेनेने विजय मिळवण्या साठी प्रतिष्ठा केली होती मात्र त्यातही आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी खरेदी विक्री संघातील १५ ही जागा भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय मिळवून निवडून आणल्या त्यामुळेच सततचा तिसरा पराभव ठाकरे शिवसेनेचा झाला आहे. याची आठवण करून देण्यासाठी भाजपकडून नगरसेवक संजय कमतेकर यानि फळक लावून पराभवाची हॅट्रिक शिवसेनेने केली याची आठवण करून दिली आहे.
दरम्यान या बॅनरवर परमपूज्य भालचंद्र बाबांच्या भूमीत सत्याचाच कायम विजय होतो. असे लिहून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.