सुशील भायजे यांची युवक राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजिक धामापूर चे येथील युवा कार्यकर्ते व आमदार शेखर निकम यांचे निकटवर्तीय सुशील भायजे यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सुशील भायजे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आजपर्यंत त्यांनी राजकीय व सामाजिक कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची आणि प्रामाणिकपणाची दखल घेऊन सुशील भायजे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुशील भायजे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करताच त्यांच्यावर पै- पाहुणे, नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.