मसुरे | झुंजार पेडणेकर
वायंगणी येथील श्री दत्त साक्षात्कारी संत दादा महाराज प्रभू यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री समर्थ दादा महाराज समाधी व दत्त मंदिर, वायंगणी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सकाळी रामदास प्रभू यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. तसेच निशाण फेरी काढण्यात आली. तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त चंद्रकांत कावले व सहकारी तसेच ओम साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन सादर झाले. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. दादा महाराज यांच्या चरित्रावर यापूर्वी दोन भागात पुस्तके प्रकाशित करणारे महाराजांचे उपासक सीताराम उर्फ नाना करमळकर यांनी तिसऱ्या भागाचे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लिखाण सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर यांनी केले आहे.या पुण्यतिथी कार्यक्रमास नाना करमळकर, उद्योजक डॉ. दीपक परब, हनुमंत प्रभू, रामदास प्रभू, दामोदर साळकर, अंभू प्रभू यांसह ग्रामस्थ व महाराजांचे भक्त उपस्थित होते.