ठाकरेंचे निर्णय योग्य होते की अयोग्य हे काळच ठरवेल;माजी मंत्री सुरेश प्रभू

Google search engine
Google search engine

संतोष राऊळ (कणकवली)

शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणुकीमध्ये पक्ष चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने घातलेली बंदी हा राजकीय निर्णय नाही. निवडणूक आयोग हे न्यायालयाच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था आहे.त्या संस्थेने घेतलेला हा निर्णय असल्यामुळे राजकीय आरोप करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांचे निर्णय योग्य की अयोग्य हा येणारा काळच ठरवेल.राजकीय पक्षाचे जीवन आणि राजकीय पक्षाचा जिवंतपणा हा जनतेच्या मनात तो पक्ष किती आहे यावर अवलंबून असतो. येणारा काळच शिवसेनेच्या अस्तित्वाचे उत्तर देईल अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली ते कणकवली येते टेली मेडिशनच्या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

मी किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली असे अनेक नेते शिवसेनेत होतो. सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते शिवसैनिक होते मात्र कोणताही निर्णय घेताना कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विचारून घेतला जात नाही. त्यामुळेच  आज शिवसेनेवर ही परिस्थिती उडवली असे अप्रत्यक्षरीत्या सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले. माजी शिवसैनिक म्हणून आम्हाला कोणी कधी काय विचारले नाही किंवा सल्लाही घेतलेला नाही त्यामुळे आम्ही कशाला सल्ला द्यायचा अशीही त्यांनी पुष्टी जोडली.