तळवडेतील शेतकरी बागायतदार मेळाव्याला उदंड प्रतिसाद
सहयोग ग्रामविकास मंडळ व तळवडे ग्रामपंचायतचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा दुग्ध व्यवसायात अव्वल दर्जाचा जिल्हा ठरणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून जिल्ह्यातील शेतकरी सहकार्य करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम व योजना राबवित असून शेतीपूरक व्यवसायाला संपूर्ण आर्थिक पाठबळ दिले जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सहयोग ग्राम विकास मंडळ गरड माजगाव व तळवडे ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने तळवडे येथे आयोजित शेतकरी बागायतदार मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत सौ. शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम यांची माहिती दिली.
यावेळी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कोकण कृषी विद्यापीठ संचालक प्रमोद सावंत, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, तळवडे शिक्षण मंडळचे बाळा पेडणेकर, सरपंच विनिता मेस्त्री, उपसरपंच प्राजक्ता गावडे, एसपीकेचे प्राचार्य डी. एल. भारमाल, एम बी कुलकर्णी . कृषि अधिकारी यशवंत गव्हाणे, संहयोग ग्रामविकास मंडळ माजगावचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर , सचिव मोतीराम टोपले खजिनदार हनुमंत देसाई, तळवडे श्री जनता विद्यालय प्राचार्य प्रतापराव देसाई, रविंद्र परब, माजी उपनगरध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नेमळे कौल कारखाना अध्यक्ष आत्माराम राऊळ, बाळा जाधव, राजाराम गावडे, बंड्या परब, कुंदा पै,दादा परब, विजय नाईक.तसेच कृषि अधिकारी व कृषी क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमाला भेट शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याच्या निमित्ताने प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना माती परीक्षण व त्याचे महत्त्व शेतातील आधुनिक तंत्रज्ञान व खत व्यवस्थापन, कोकणातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेतीचे विविध पर्याय ,कोकणातील शेळी पालन व्यवसाय संधी, आंबा व काजू पीक संरक्षण शेती व फळ बागायती संदर्भात शासनाच्या योजना व सवलती यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. नितीन सावंत , यशवंत गवाणे, सुमीत भोसले, डॉ. विजयकुमार देसाई यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भात व शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतकऱ्यांनी शेती करताना कोणती काळजी घ्यावी कोणत्या औषधाचां वापर करावा याविषयी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
यामध्ये उमेद अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहायता समूह उत्पादक गट आयएफसी रोपवाटिका खत विक्री केंद्र ग्राम संघामार्फत विविध शेतीशी निगडित उत्पादने नर्सरी बियाणे यांचे स्टॉल लावले होते. तसेच यामध्ये अनमोल प्रभाग संघाच्या सर्व ग्राम संघाच्या ग्राम संघाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये तालुका अभियान कक्षातून स्वाती रेडकर, रिधिमा पाटकर, आयएफसी ब्लॉक अँकर प्रिया गावडे, प्रभाग समन्वय सचिन नाईक, रूपाली गुडेकर, श्रुति रेडकर यांसह सर्व सीआरपी, सर्व केडर, प्रभाग संघ पदाधिकारी व ग्राम संघ पदाधिकारी आणि सर्व समूहातील महिला उपस्थित होत्या.
फोटो – तळवडेतील शेतकरी बागायतदार मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना श्रीमंत शुभदादेवी भोसले यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत ,सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉ. प्रमोद सावंत , तळवडे सरपंच वनिता मेस्त्री ,प्रा. दिलीप गोडकर. प्राचार्य प्रतापराव देसाई व अन्य