केंद्रीय मंत्री नारायण राणे , सौ निलमताई राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

सर्वांना सुखी ठेवा- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे साकडे

कुडाळ | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे व निलमताई राणे यांनी कुडाळ येथील  यांनी सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेत महाआरती केली. यावेळी राणे यांनी सर्वांना सुखी ठेवा, असे साकडे सिंधुदुर्ग राजाकडे घातले. केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि कुटुंबीय यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे कुडाळ येथे श्रीगणेश चतुर्थी निमित्त सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना सतरा दिवसांसाठी करण्यात आली होती. गुरूवारी या राजाचे दर्शन केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ निलमताई राणे  यांनी घेत गणरायाचे पुजन व महाआरती केली.  तसेच सर्वांना सुखी ठेवा असे साकडे घातले. या भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा भाजप सरचिटणीस रणजित देसाई, युवानेते विशाल परब, आनंद शिरवलकर, महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्या तेरसे,  चिटणीस विनायक राणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे, कुडाळ भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ओरोस मंडळ तालुका अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, नगरसेवक निलेश परब, ॲड राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर, भाजप शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.