बांदा गांधीचौक नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्षपदी राकेश केसरकर

 

विविध कार्यक्रमांचे नियोजन

बांदा (प्रतिनिधी) :    बांदा गांधीचौक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राकेश केसरकर, उपाध्यक्ष अनिल नाटेकर, सचिव विवेक विरनोडकर व खजिनदारपदी ओंकार नाडकर्णी यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
रविवार १५ ऑक्टोबर रोजी श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल. सोमवार १६ रोजी देवीचा गोंधळ व जागर, मंगळवार १७ रोजी पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, बुधवार १८ व गुरूवार १९ रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा होईल.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७ हजार ७७७ रुपये, द्वितीय ५ हजार ५५५ व तृतीय ३ हजार ३३३ रुपये असेल. हिट जोडीसाठी आकर्षक पारीतोषिक ठेवण्यात आले आहे. शुक्रवार २० रोजी गायन स्पर्धा असेल. त्यासाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपये आहे. ग्रुप डान्स स्पर्थेसाठी आकर्षक बक्षीसे पुरस्कृत करण्यात आली आहेत.
शनिवार २१ रोजी १२वर्षाखालील लहान मुलांसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी प्रथम पारितोषिक २ हजार २२२ रुपये, द्वितीय १ हजार १११ रुपये, तृतीय ५५५ रुपये व उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत. तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक ३ हजार ३३३ रुपये, द्वितीय २ हजार २२२ रुपये, तृतीय १ हजार १११ रुपये व उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत. रविवार २२ रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, सोमवार २३ रोजी गोव्यातील नामांकीत ऑर्केस्ट्रा व मान्यवरांच्या उपस्थित सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ, मंगळवार २४ रोजी विसर्जन मिरवणूक होईल.
दांडिया स्पर्धेसाठी संपर्क ओंकार नाडकर्णी (९०७५८५७५५८) व अक्षय मयेकर (९५०३८७१९२४), गायन, रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्ससाठी धनेश नाटेकर (९४०५४९६८६०), फँन्सी ड्रेससाठी अर्णव स्वार (९०७५७२९९६६) यांच्याशी संपर्क करावा.