साटेली खालचीवाडी महापुरुष देवस्थानचा ११ रोजी वार्षिक जत्रोत्सव

सातार्डा I प्रतिनिधी : सातार्डा तर्फ साटेली – खालचीवाडी येथील श्री महापुरुष देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार ११ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा .व दुपारी महाप्रसाद तसेच रात्री १० वाजता पावणी होणार आहे. त्यानंतर रात्री १ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खालचीवाडीतील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.