रत्नागिरी : दि. 6/10/2023 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय येथे सायं. ५ वाजता जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या महत्वाच्या बैठकीला दक्षिण जिल्हाभरातून भाजपा चे ज्येष्ठ व महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा ,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याच्या दृष्टीने बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे महत्वाचे मार्गदर्शन केले.
शत प्रतिशत भाजपा जिल्हयात होण्यासाठी महाविजय २०२४ अंतर्गत बुथ सक्षमीकरण, सरल अँप डाऊनलोड, मेरी माटी मेरा देश हे कार्यक्रम प्रभावपिणे राबविणेसाठी मंत्री महोदयानी कानमंत्र दिला. या वेळी बाळासाहेब माने, प्रमोद जठार व संघटनमंत्री यांनी मार्गदर्शन केले. श्री. चहाण नेतृत्वात सिंधुदुर्गाप्रमाणे रत्नागिरी मध्येही पक्षाची घोडदौड सुरु झाली आहे. त्यात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची अनुभवी व्यूहरचनाही कामी येत आहे. या कार्यकारीणी वेळी श्री सदानंद भागवत व श्री. बाळ दाते यांचाही मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करणेत आला.
पंतप्रधान मोदीजीच्या कार्याला प्रेरीत होऊन. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे नेतृत्वात ओरी येथील प्रतीक देसाई यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसहित भाजपा मध्ये प्रवेश केला. प्रतीक देसाई याला मानणारे पंचक्रोशमिध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनीही भाजपात प्रवेश केला. त्याच बरोबर रत्नागिरी येथील श्री. विनय पेठे ही भाजपा मध्ये सक्रीय झाले
या बैठकीला राजापुर विधानसभा, संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्का ताई विश्वासराव, प्रमोद अधटराव जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, रविंद्र नागरेकर, संगीता जाधव, अमित केतकर, महिला मोर्चा अध्यक्ष प्रमुख सुजाता साळवी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर,सर्व माजी जिल्हाध्यक्ष असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.