कणकवली : शहरातील नाईक एंटरप्राईजेससमोर महामार्ग सर्व्हिस रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत वाहने लावून ठेवल्याप्रकरणी चार टेम्पो चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश बाळा घाडीगावकर (३७, रा. कसवण तळवडे), पुंडलिक श्रीधर घाडीगावकर (४२, रा. वागदे – देऊळवाडी), नितीन दिनकर तळेकर (३४, रा. ओसरगाव- कानसळेवाडी), विनायक बळीराम नाईक (५९, रा. ओसरगाव) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण व पोलिस शिपाई आर. के. पाटील यांनी केली.