माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे शासकीय रेखकला परीक्षा झाली. यामध्ये इलेमेंटरी परीक्षेसाठी १५७ तर इंटरमिजीएट साठी १४७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.या परीक्षेला माखजन हायस्कूल ,श्री देव केदारनाथ विद्यामंदिर,आरवली,एम.डी. नाईक हायस्कुल कोंडीवरे,दाउद अल रजा इंग्लिश मिडीयम कोंडीवरे,इंग्लिश मिडीयम स्कुल सरंद माखजन. या शाळा प्रविष्ठ झाल्या होत्या. परीक्षेचे संचलन अमोल पाटील यांनी केले.