राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून आदर्श आणि जबाबदार व्यक्ती म्हणून पूढे येताना स्वतःचा
आरसा स्वतः बनायला शिकायला हवे. व्यक्ती लहानपणी मी नंतर आम्ही आणि आम्हीचा आपण बनणे हेच खरे एन एस एस आहे. असे मत ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाच्या आंडेआडोम येथील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीराच्या सांगता समारंभा प्रसंगी व्यक्त केले. या सांगता समारंभा प्रसंगी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अशोक बागवे पूढे व्यक्त होतांना कविता सादर केले कविता सादर करताना मराठी भाषा सोपी असते परंतु अनेक वेळेस अवजड करून लिहिली जाते विविध प्रकारचे काव्यं सहज सोप्या भाषेत करता येतात असे मत व्यक्त केले.
यावेळी कॅप्टन दळवी यांनी मार्गदर्शन करताना एस, एम जोशी, महात्मा गांधी यांना स्मरण करून कविता सादर केले. व अनुभव कथीत करत युवकांची भुमिका स्पष्ट केले. दरम्यान सतिश सोळांकुरकर यांनी बीएआरसी येथे काम करतांनाचे अनुभव व्यक्त करताना विकासातील संशोधनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अॅडव्होकेट कुवळेकर यांनी कविता सादर केली.दांडेआडोम येथील 28 डीसेंबर पासून सुरू झालेल्या श्रमसंस्कार निवासी शिबीरा दरम्यान स्वयंसेवकांनी वनराई बंधारे बांधणे, साफसफाई करणे, शोषखड्डे खोदणे, या सारखी श्रमदानाच्या माध्यमातून कामे केली. यावेळी विद्यार्थ्यांना हिराचे झाडू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान शिबीरात बौद्धिक सत्रांमध्ये सुमित प्रतिभा संजय संविधान निर्मिती प्रक्रिया व संविधानाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी महिला सक्षमीकरण, प्रा. सुकुमार शिंदे यांनी राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची भूमिका, कार्यक्रम अधिकारी सुशील साळवी यांनी व्यक्तिमत्त्व विकास, तर श्री हर्षल तुळपुळे यांनी आपले गाव आपले विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ आशा जगदाळे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधीत केले.
सांगता समारंभा प्रसंगी कवी अशोक बागवे, कॅप्टन दळवी, सतिश सोळांकुरकर, अॅडव्होकेट कुवळेकर, लेखिका रश्मी कशेळकर अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ आशा जगदाळे. प्रा. सुकुमार शिंदे, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा सुशील साळवी, प्रा. तेजस्वी या कांबळे, प्रा. पालकर प्रा. सायली कांबळे आणि एन एस एस स्वयंसेवक स्वयंसेवक उपस्थित होते