पर्यटन सप्ताह सांगता समारंभ निमित्त सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाच्या सांगता समारंभा निमित्त महाविद्यालयाच्या हिंदी विभाग, सांस्कृतिक विभाग व एनसीसी विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत राहुल उदय चव्हाण (स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) याने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक शुभम प्रकाश सकपाळ (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय), तृतीय क्रमांक अस्मिता जाधव (रिगल कॉलेज कणकवली) व चतुर्थ क्रमांक केतकी कांदळगावकर (आचरा कॉलेज) हिने प्राप्त केला.
विजेत्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, IQAC प्रमुख डॉ. सुमेधा नाईक प्रा.हंबीरराव चौगले, डॉ.उज्वला सामंत, डॉ. एम.आर. खोत सर्व प्राध्यापक, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पंतवालावलकर सचिव चंद्रशेखर कुशे यांनी अभिनंदन केले.