स्वप्नील कदम भुईबावडा
भुईबावडा येथील रहिवासी व रेशन दुकानदार मिलिंद अनंत बोभाटे वय ५० यांचे रविवारी संध्याकाळी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भुईबावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भुईबावडा येथे ते रेशन दुकान गेली अनेक वर्षे चालवत होते. गावच्या सामाजिक कार्यात ही त्यांचा चांगला सहभाग होता. वैभववाडी तालुका रेशन दुकानदार संघटनेचे ते प्रमुख पदाधिकारी होते. संघटना वाढीत त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, विवाहित बहिणी असा परिवार आहे.