वेंगुर्ला, दोडामार्ग येथील ४ लाभार्थींना रोटरीतर्फे मोफत जयपूर फुट प्रदान

वेंगुर्ले : प्रतिनिधी : डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, लोककल्याण मंडळ, कोल्हापूर यांचे सौजन्याने, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे
२ लाभार्थी राजन नायर व‌ अनामिका शिरोडकर तसेच रोटरी क्लब कॅश्यु सिटी दोडामार्गचे २ लाभार्थी रवींद्र कांबळे व सुशीला नांदवळकर यांना मोफत जयपूर फुट लोककल्याण मंडळ कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला, व्यवस्थापक चव्हाण, कांबळे व ट्रस्टचे मान्यवर उपस्थित होते.
यासाठी रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पिएचएस रो.राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर रो. संजय पुनाळेकर, पास्ट प्रेसिडेंट रो.सुनिल रेडकर, कॅश्यु सिटी दोडामार्गचे रो.विशांत तळवडेकर, सचिन नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला, लोककल्याण मंडळ कोल्हापूर अध्यक्षा उत्कर्षा पाटील व सर्व विश्वस्त व्यवस्थापक मंडळ मान्यवरांचे, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट शंकर वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, ट्रेझरर पंकज शिरसाट, रोटरी क्लब ऑफ कॅश्यु सिटी दोडामार्गचे प्रेसिडेंट दयानंद नाईक, सेक्रेटरी विठोबा पालयेकर, ट्रेझरर सुर्यकांत गवस यांनी आभार मानले आहेत. गणेशोत्सव स्वतःच्या पायांवर उभे राहून साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद आम्हाला लोककल्याण मंडळ कोल्हापूर, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळाल्याची कृतज्ञता लाभार्थीनी व्यक्त केली.