दापोली | प्रतिनिधी: नुकतेच राज्यशासन व मुख्यत्वे आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत लोकांची तपासणी करून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याच योजनांचा भाग म्हणून ग्रांमस्थांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. कार्यक्रमावेळी कीटकजन्य आजारांबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. असर्सर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ब्लड प्रेशर , मधुमेह यावरही आता औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे मिळत असून आता ग्रामस्थही त्याचा लाभ घेत आहेत.
शिबिरासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सरपंच व अन्य ग्राम पंचायत सदस्य यांनी उत्तम सहकार्य केले. सदरचे शिबिर तालुका आरोग्य अधिकारी श्री. किशोर जाधव, पीसई वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा भागवत, डॉ. वैदेही जोईल यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी माटवण उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी , आरोग्य सेविका , उपकेंद्र मदतनीस तसेच आशा ताई उपस्थित होते