खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. पूनम बिर्जे पैठणीच्या मानकरी

Google search engine
Google search engine

रोहीणी वालावलकर, दिव्या गावडे अनुक्रमे द्वितीय व तृतीय

पिंगुळी देऊळवाडी महापुरुष जत्रोत्सवानिमित्त आयोजन

कुडाळ । प्रतिनिधी : पिंगुळी-देऊळवाडी येथील श्री देव महापुरुष वार्षिक जत्रोत्सवानिमित्त आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. पूनम प्रभाकर बिर्जे पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ. रोहिणी राहुल वालावलकर व सौ. दिव्या दीपक गावडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके जिंकली. दरम्यान, प्रथम आलेल्या बिर्जे यांना मानाची पैठणी व चांदीचे शिल्ड देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय सौ. वालावलकर यांना मिक्सर व तृतीय सौ. गावडे यांना प्रेस्टीज कुकर आदी बक्षिसे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी विजेत्यांचे श्री देव महापुरुष देवस्थान समितीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी विनायक पिंगुळकर,हेमंत कुबल,बबलू पिंगुळकर, आबा वालावलकर,आनंद कुडाळकर,कपिल म्हापसेकर,सतिष धुरी,गोट्या वालावलकर, प्रविण पिंगुळकर,निलेश वालावलकर, किरण म्हापसेकर, विठ्ठल वालावलकर, पराग पिंगुळकर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.या खेळासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आनंद विजय कुडाळकर यांनी पुरस्कृत केले होते. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य मंगेश चंदू चव्हाण व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक काशिनाथ बापू निकम यांच्याकडून देण्यात आले होते. तसेच सहभागी सर्व स्पर्धक महिलांसाठी सौ. ऋतुजा हेमंत कुबल व ग्रामपंचायत सदस्या दिव्या दीपक गावडे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या. दरम्यान या खेळाच्या निवेदनाची जबाबदारी शुभम धुरी यांनी सांभाळली.