विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन वितरण कंपनी मधील तांत्रिक कामगारांचे प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यभर क्रमबद्ध आंदोलन करणार

राजापूर (वार्ताहर): महावितरण मधील तांत्रिक कामगारांच्या हक्कासाठी कायम लढणाऱ्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन कडून राज्यभरात क्रमबद्ध आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यालय पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यातील अमलबजावणी बाकी असलेल्या प्रश्नांसाठी व आवश्यक मटेरियलसाठी हे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. वितरणचा लाईनस्टाफ स्वतःचे दुचाकी वाहन कंपनीच्या गतिमान सेवेसाठी मागील अनेक वर्षापासून वापरत आहे. मात्र त्याला प्रत्यक्ष फिरण्यासाठी तेवढे इंधन मिळत नाही. १० वर्षापूर्वी या मागणीला प्रशासनाकडून तत्वतः मान्यता दिली तसे लेखी दिले. पुढे २०१८ च्या वेतन करारात ती मागणी समाविष्ट झाली परंतु cmd व संचालक बदलले की त्यांची मते बदलतात त्याचाच फटका या निर्णयाची अंमलबजावणी करताना होत असल्याचे कामगार युनियनचे म्हणणे आहे. २०२३ ते २०२८ ची वेतनवाढ आली आहे, मात्र वाढीव इंधन भत्ता अद्याप लागू झाला नाही. संघटनेने मागील वर्षी विभाग ते प्रादेशिक पातळीपर्यंत आंदोलन केली. दुचाकी बंद ठेवल्या मात्र प्रोसेस सुरू करून पुन्हा प्रस्ताव मागे पुढे येवढेच काम सुरू आहे.

जाणीवपूर्वक निर्माण केलेली कारागीर ब क , मीटर टेस्टर १,२,३ आणि प्रधान व वरीष्ठ यंत्रचालक यांची उच्यपदाच्या लाभाची विसंगती दुर करण्याचे मान्य केले आहे, त्याची अमलबजावणी बाकी आहे, कामाचे स्वरूप एकच असल्याने कोणत्याही उपकेंद्रात प्रधान व वरिष्ठ यंत्रचालक यांना पोस्टिंग देण्याबाबत मान्य केले होते त्याची अंमलबजावणी नाही. मार्च २०१९ नंतरची उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालविण्यास दिली आहेत त्याठिकाणी नियमित कर्मचारी देण्याबाबत मान्यता दिली., मे महिन्यात चर्चा होत असताना एका महिन्यात अमलबजावणी करण्याचे मान्य केले. ती अद्याप झालेली नाही. कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्याचे उद्देशाने महावितरण मागील १० वर्षापासून सहाय्यक पद्धतीने भरती करत आहे. नियमित कर्मचारी यांचे पगारवाढी सोबतच त्यांना मानधन वाढविले जाते. मात्र कंपनी नियमित कर्मचारी यांना मागील फरकासह पगारवाढ लागू करते मात्र सहाय्यकाना कराराचे तारखेच्या पुढे वाढ लागू करते म्हणून नियमित कर्मचाऱ्यांचे सोबत त्यांचे मानधन १/४/२०२३ पासून वाढवावे यावर १२ मे रोजी cmd स्तरावर बैठक देखील झाली त्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सूचना दिल्या होत्या. त्यावर कोणतीच कार्यवाही नाही. पदोन्नती सोबत विनंती बदल्या कराव्यात ही मागणी देखील संघटनेने केली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्डवर काम करताना लागणारे आवश्यक मटेरियल, T & P मिळत नाही यामुळे अनेक अडचणी काम करताना येत आहेत.

या सर्व प्रश्नासाठी संघटना दिनांक १० ऑक्टोंबर 2023 रोजी सर्व मंडल कार्यालयासमोर निदर्शने करून गेट मीटिंग घेणार आहे. त्यानंतर दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी सर्व परिमंडल कार्यालयासमोर निदर्शने करून गेट मीटिंग घेणार आहे. पुढे दिनांक २६ ऑक्टोंबर पासून सर्व परिमंडल कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण करणार आहे.. योग्य दखल न घेतल्यास मुख्यालय प्रकाशगड येथे आंदोलन संघटना करेल असा इशारा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस आर.टी देवकांत यांनी दिला आहे. या आंदोलनात कोकण झोन मधील सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पूर्ण ताकदिने सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय कोषाध्यक्ष संतोष घाडगे संघटनेचे कोकण झोन अध्यक्ष किशोर साळुंखे, कोकण झोन सचिव- महेंद्र पारकर, रत्नागिरी सर्कलचे अध्यक्ष बिपीन कोल्हापुरे, रत्नागिरी सर्कल सचिव महेंद्र शिवलकर, रत्नागिरी डिव्हिजन सचिव संदीप नेवरेकर,चिपळूण डिव्हिजन सचिव निलेश खेतले, खेड डिव्हिजन सचिव सतिश भोसले यांनी केले आहे.