वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा आंबेगाळीचा प्रभंजन भानुदास राणे हा भारतीय कृषी अनुसंधान संस्था (नवी दिल्ली) मार्फत घेतलेल्या ICAR AICE -JRF/SRF 2023 -24 च्या Ph.D च्या प्रवेश परीक्षेमध्ये संपुर्ण देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तसेच EWS आरक्षणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. भारत सरकार मार्फत त्याला Ph.D शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
भारतीय कृषी अनुसंधान संस्था ( नवी दिल्ली) मार्फत घेण्यात आलेल्या junior research felloship 2021 ( PG ) मध्ये संपूर्ण देशात तो दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तसेच EWS आरक्षणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. दहावी मध्ये पाट हायस्कूल मध्ये 96 टक्के मिळवून पहिला आला होता. या यशा बददल त्याचे तसेच त्याचे वडील भानुदास राणे व आई काजल राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.