दापोलीत ग्रामसेवक युनियनचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

दापोली | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ (युनियन) शाखा दापोली यांच्या वतीने आयोजित दापोलीतील प्रथमच भव्य अबसे स्नेहसंमेलन सालदुरे येथे आज उत्साहात संपन्न झाले. ग्रामविकासाचा कणा म्हणजे ग्रामसेवक,
सक्षम ग्रामसेवक गावचा विकास करु शकतो. ग्रामविकास करीत असतांना येणार्‍या विविध अडचणी आणि त्यावर मात कशी करावी या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संगठना शाखा दापोली यांच्या वतीने आयोजित दापोलीतील पाहिले वहिले भव्य असे स्नेहसंमेलन सालदुरे येथे आज संपन्न झाले. सदर कार्यक्रम प्रसंगी निवृत्त ग्रामविकास अधिकारी माजी जिल्हा अध्यक्ष श्री अनिल मोहिरे हेमंत सरदेसाई, शशिकांत विचारे, अनिल मोहीरे,रविंद्र गुरव आदि. सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करणेत आला.यावेळी विद्यमान विस्तार अधिकारी राजेंद्र मोहिते,तसेच दापोली तालुका अध्यक्ष सुरेंद्र महाडिक ,सचिव संदिप सकपाळ ,जिल्हा सह सचिव, सुमित तांबे जिल्हा महिला कौन्सिलर आणि उपाध्यक्ष योगेश पवार कोषाध्यक्ष विकास जाधव संघटक माळशिकारे सल्लागार प्रदिप चव्हाण, उदय शिगवण ,शरद गौरत आदि.सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.रोजच्या दगदगीतून एक दिवस स्वतःसाठीही जगावे यासाठी स्वच्छंद पणे मनसोक्त आनंद घेण्यासाठी हा उपक्रम योजील्याचे सांगत तालुकाध्यक्ष सुरेंद्र महाडिक यांनी सर्वांनी मनमोकळे होऊन आनंद घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले व असेच वर्षातून एकदा एकत्र येऊन असा कार्यक्रम दर वर्षी घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेश कदम तालुका सहसचिव यांनी केले