प्रतिनिधी – मंडणगड .मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई संचलित पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल, पणदेरी या हायस्कूल मध्ये इ.8 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार सक्षम रघुनाथ बाईत या विद्यार्थ्याने ISRO व नासा कडून आयोजित स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.त्याने या परीक्षेत तालुक्यात 8 वा व पणदेरी केंद्रात दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे.त्याच्या या यशाबद्दल शालेय समिती पणदेरी चे अध्यक्ष रामदासजी रेवाळे व सदस्य यांच्याकडून त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला..
कुमार सक्षम बाईत च्या या यशाबद्दल मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 या संस्थेचे अध्यक्ष आमदार भाईसाहेब जगताप, सरचिटणीस विनोद जी दळवी,चिटणीस दादासाहेब जगताप, चिटणीस ऍड. श्री. अभिजित गांधी, सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी,शालेय समिती, शिक्षक पालक शिक्षक संघ, संपूर्ण पणदेरी पंचक्रोशी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.