घटनाकारांचे स्वप्नपुर्तीचे दिशेने देशाचे वाटचाल सुरु- श्री. भुषण गवई न्यायमुर्ती सर्वोच्च न्यायालय

मंडणगड | प्रतिनिधी :  सामाजीक व आर्थीक न्यायाच्या राज्यघटनेस अभिप्रत तत्वाचे आधारे देश विविध क्षेत्रात पुढे जात आहे घटनाकारांचे स्वप्नपुर्तीचे दिशेने होणाऱ्या वाटचालीत न्यायापालिका व प्रशासन एकत्रीपणे काम करीत असल्याने सर्वसामान्यास न्याय मिळवून देण्याची प्रक्रीया अधिक गतिमान होत असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री. भुषण गवई यांनी मंडणगड येथे केले. 8 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्यामार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथमश्रेणी न्यायालाचे उद्घाटन व न्यायालयाचे नविन इमारतीचा कोनशीला श्री. गवई यांच्या हस्ते करण्यात आली या निमीत्ताने आय़ोजीत स्वागत समारंभाचा अध्यक्षीय समारोप करत होते यावेळी ते पुढे म्हणाले की बाबासाहेबांच्या वकील व्यवसायाच्या शताब्दी वर्षाचे वर्षपुर्तीचे औचीत्यसाधून मंडणगड येथे न्यायालय सुरु कऱण्यात आले आहे याचा अभिमान वाटत आहे. जगातील विद्वानांमध्ये गणना होणाऱ्या बाबासाहेबांनी अनेक क्षेत्रात काम केले आहे मात्र देशास दिलेले राज्य घटना हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. त्यांच्या व्देष्टपणा व दुरदृष्टीचा पच्याहत्तर वर्षानंतरही साक्ष मिळते.

राज्यघटनेस अस्पृष्यता मान्य नाही कनिष्ठ व वरिष्ठ असे काही न्यायपालिकेने आपल्या आचरणातही समानता आणली आहे त्यामुळे मंडणगड न्यायलयाच्या उद्घाटन प्रसंगी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश हजर असतानाही कनिष्ठ न्यायालयाचे न्यायमुर्ती न्यायमुर्तीचे खुर्चीत स्थानापन्न झाले व कामकाजास सुरुवात झाली राज्यघटनेने घालून दिलेल्या चौकीटीत राहून प्रत्येक घटकाने काम केल्यास अडचण येते नाही जनतेच्या सामाजीत व आर्थीक न्यायकरिता सर्वच घटकांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती माधव जामदार यांनी भुषविले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती श्री. भुषण गवई, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमुर्ती देवंद्रकुमार उपाध्याय, रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायाधीश विनायक जोशी, पालकमंत्री उदय सामंत मंडणगडचे न्यायमुर्ती एम.ए.शिंदे यांच्यासह बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवाचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.