जांभळी येथील खाडीत सापडला अज्ञाताचा मृतदेह

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जांभारी येथील खाडीत अज्ञाताचा मृतदेह आढळून आला.याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही घटना शनिवार 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वा.निदर्शनास आली.
याबाबत खबर देणार यांना शनिवारी सायंकाळी जांभारी येथील जमातवाडी येथे खाडीच्या पाण्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगतान दिसून आला.त्यांनी तातडीने याबाबत जयगड पोलिसांना माहिती देतान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.