देवगड येथील खलाशाचा आकस्मिक मृत्यू

देवगड | प्रतिनिधी
देवगड बंदरात नौकेवर कामाला असलेला खलाशी अजित नारायण उप्पर(४१) मू. रा कर्नाटक सध्या देवगड बंदर याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना देवगड मच्छीमारी सेंटर नजीक ८ऑक्टोबर रोजी स.७.३० च्या मानाने देवगड येथे घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेली दोन तीन दिवस मयत इसमाला उलटी जुलाब आजाराचा त्रास होत होता त्यांचेवर खाजगी उपचार सुरू होते अशक्तपणा येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव करीत आहेत.