माजी खासदार निलेश राणे यांचा पाठपुरावा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर
मालवण | प्रतिनिधी : मालवण कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन येथील इमारत दुरुस्तीसाठी भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे पाठपुराव्या नंतर शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 95 लाख निधी मंजूर केला आहे.
मुलींच्या वसतिगृह इमारतची दुरुस्ती करणे, कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती आदी कामे असणार आहेत. याबाबत माहिती भाजप युवामोर्चा मालवण तालुका अध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिली आहे.
शासकीय तंत्रनिकेतन येथील इमारत दुरुस्ती व अन्य प्रशनी मंदार लुडबे व अन्य पदाधिकारी यांनी माजी खासदार निलेश राणे, पालकांमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे.