प्रथितयश व्यापारी अरविंद कुशे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी ):
मसुरे मर्डेवाडी येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी अरविंद शांताराम कुशे (७८ वर्ष )यांचे नुकतेच निधन झाले. जुन्या काळातील प्रथीत यश व्यापारी म्हणून त्यांची मालवण तालुक्यामध्ये मोठी ओळख होती. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे कार्य होते. गरीब, गरजवंतांना ते नेहमी सर्वतोपरी मदत करत असायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, भाऊ, बहीण, पुतणे, पुतणी,जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कूशे, जगदीश कुशे,उमेश कूशे यांचे ते वडील होतं.