रत्नागिरी :लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे एक ते नऊ ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ॲड शबाना वस्ता यांचे ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन देण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी निरीक्षण गृह येथे गांधी जयंती व शास्त्री जयंती साजरी करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच मुलांना खाऊ देण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी अ के देसाई हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना योगाभ्यास करण्याकरिता सतरंज्या भेट देण्यात आल्या. ४ ऑक्टोबर रोजी आनंदी अनुसुया वृद्धाश्रम, पावस येथे वृद्ध महिलांकरता डायपर देणे, प्रथमोपचार किट देणे व नोटीस बोर्ड व फळे देणे हे सेवाकार्य करण्यात आले. 5 ऑक्टोबर रोजी डायबेटीस अवेअरनेस या विषयावर डॉक्टर मृदुला गुजर यांचे स्वामी समर्थ मठ, साळवी स्टाॅप येथे मार्गदर्शन देण्यात आले, तसेच 4 ऑक्टोबरला वर्ल्ड आर्किटेक्चर डे साजरा करण्यात आला. 6 ऑक्टोबर रोजी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर डॉक्टर शरद आपटे यांचे गोपटे जोगळेकर कॉलेजला मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर करण्यात आले, यावेळी २५ बाॅटलचे रक्तसंकलन झाले. सध्या रक्ताची जास्त गरज असल्यामुळे योग्यवेळी रक्तदान शिबिर घेतले असे रक्तपेढीच्या मॅथ्यू सिस्टर यांनी लायन्स क्लब रत्नागिरीला धन्यवाद देताना सांगितले. ८ ऑक्टोबर रोजी स्वामी समर्थ मठ, नाचणे येथे आय चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला, यात चाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच 8 ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह प्रदर्शनात लायन्स क्लब पुरस्कर्ते होते. अशा रीतीने भरगच्च सेवाकार्याने लायन्सने सेवा सप्ताहाचे सात दिवस साजरे केले या सर्व कार्यक्रमांकरिता सर्व लायन सदस्यांचे सहकार्य लाभले यावर्षीच्या अध्यक्षा लायन शिल्पा पानवलकर यांनी लायन्स क्लब मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा देण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा लायन्स क्लब रत्नागिरी ने प्रयत्न केला. या सर्व सेवा कार्यांना लायन सचिव संजय पटवर्धन लायन खजिनदार श्रद्धा कुलकर्णी एमजेएफ लायन पराग पानवलकर एमजेएफ लायन डॉक्टर संतोष बेडेकर, सुप्रिया बेडेकर, स्नेहल राणे, मेघना शहा सिरत राणे, बिपिन शहा, फैज अली फडनाईक, झोन चेअरमन लायन श्रेया केळकर, लायन राजीव लिमये लायन चंद्रशेखर पटवर्धन, विशाल ला शबाना वस्ताढोकळे,ला दत्तप्रसाद कुलकर्णी ला शैला वणजू ला अमेय भिसे उपस्थित होते लायन मधील डॉक्टर सचिन पानवलकर, अभिजीत गोडबोले व लायन सचिन बारटक्के यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे वरील सेवा कार्यात करता डॉक्टर सुनिता चव्हाण, फैज अली फडनाईक, लायन गणेश धुरी व लायन संजय पटवर्धन यांनी आर्थिक मदत केली.